Pune
08042757389
+919146010444

*" मनुष्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा

*डॉ. के टी पलूसकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि के पी पॅरामेडिकल इन्स्टिटयूटचा दहावा वारकरी आरोग्य सेवा उपक्रम*
I
*पुणे/पंढरपूर:*
डॉक्टर के टी पलूसकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि के पी पॅरामेडिकल इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने गेली दहा वर्षे अविरतपणे सुरू असलेला वारकरी आरोग्य सेवा उपक्रम यंदाही सुरू झाला आहे. संस्था अनेक वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक कामासोबत , मोफत आरोग्य सेवा करत आलेली आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी संस्थेचे संस्थापक ऍड. कृपाल पलूसकर, प्रा. कोमल पलूसकर, प्रा. किरण कुंभार शिक्षक वृंद,डॉक्टर आणि पॅरामेडिकल विद्यार्थ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

पायाला जखमा, उष्णतेचा त्रास, थकवा, ब्लडप्रेशर तपासणी आणि प्राथमिक उपचार यासह मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि पाणी, बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले. या वेळी विध्यार्थी प्रतिनिधी मनोज रोकडे,अली सय्यद, सोमनाथ वहले,यश गायकवाड, शुभम राऊत, हरिता अंगरवार,स्नेहा जाधव इ. उपस्थित होते

*" मनुष्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा "* या भावनेतून गेली 10 वर्षे आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. वारकऱ्यांची सेवा करणे म्हणजेच विठ्ठलाची सेवा आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष ॲड. कृपाल पलूसकर यांनी केले.
#KPParamedicalInstitute
#HealthcareCareer
#ParamedicalCourses
#MedicalEducation
#AdmissionOpen
#JobOrientedCourses
#CareerAfter12th
#CareerAfter10th
#FutureHealthcare
#KPParamedical
 2026-07-11T13:28:11

Keywords